Amravati Accident | निवडणूकीच्या धामधूमीत अकोटमधील राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराचा अपघाती मृत्यू, पतीसह मुलगा गंभीर

तोंडगावजवळ ट्रकने दुचाकीला दिली धडक, अकोट नगरपालिकेसाठी प्रभाग 4 मधून होत्‍या अजित पवार गटाच्या उमेदवार
Amravati Accident
मृत उमेदवार अलमास परवीन शेख Pudhari Photo
Published on
Updated on

 अमरावती : नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार रंगात येत असतांनाच अकोट येथे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अलमास परवीन शेख सलीम (अकोट) यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे. परतवाडा चांदूरबाजार मार्गावर तोंडगावजवळ आज शनिवार २९ नोव्हेंबरला हा अपघात झाला. यात पती शेख सलीम आणि मुलगा देखील जखमी आहे.या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर अकोट मध्ये होणारे सर्व प्रचार कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. 

माहितीनुसार, राष्ट्रवादी अजित पवार गट नगरसेवक पदाच्या महिला उमेदवार अलमास परविन शेख सलीम शनिवारी सकाळी अकोला जिल्ह्यातील अकोट वरून त्यांचे पती आणि मुलासोबत त्यांच्या चांदूरबाजार तालुक्यातील शिंदी बु. येथील माहेरी जाण्यासाठी निघाल्या होत्या.

Amravati Accident
Amravati Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे ठार

या दरम्यान परतवाडा चांदूरबाजार मार्गावर तोंडगाव जवळ एका ट्रकने त्यांच्या होंडा शाईन दुचाकी एमएच २७ बीके ४९२० ला जोरदार धडक दिली. त्यात अलमास परवीन यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर पती आणि मुलगा जखमी आहे. त्यांच्यावर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. नागरिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Amravati Accident
Illegal Gambling | अकोट पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड: ९ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

अल्मास परवीन शेख या अकोट नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चार मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार होत्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात शोकाकूल वातावरण आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news