

Akot police raid
अकोला : अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनांतर्गत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रविवारी पोलिसांनी धाड टाकली. यावेळी ९ जुगारीविरूद्ध गुन्हा दाखल करून १ लाख ८२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, देवरी फाट्यानजीक हॉटेल सागवानच्या मागे काही जण पत्तेचा जुगार खेळत आहेत. ही माहिती सहायक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी व पंचासह जुगारावर धाड टाकली असता ९ जण जुगार खेळातांना मिळून आले.
त्यांच्याजवळून ५२ तास पत्ते, नगदी २२,५०० व पाच मोटारसायकल किंमत अंदाजे १ लाख ६० हजार, असा एकूण १ लाख ८२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.