Amravati Murder | युवकाची निर्घृण हत्या, आरोपी पसार : खुनाचा रक्तरंजित बदला 

बोरनदी धरणाच्या प्रवेशद्वारावरील घटना : मयत तरुण यश रोडगे हत्याकांडातील आरोपी
Amravati Murder
घटनास्थळावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
Published on
Updated on

अमरावती: वाळकी रोडस्थित बोरनदी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी (दि.१९) दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास चार हल्लेखोरांनी मिळून धारदार शस्त्राने एका युवकाची निर्घृण हत्या केली.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.हत्या झालेल्या युवकाचे नाव मन्या उर्फ मंथन रवींद्र पाळनकर रा.शिलांगण रोड, सातुर्णा, अमरावती असे आहे.मन्या उर्फ मंथन हा काही महिन्यांपूर्वी अमरावतीत झालेल्या यश रोडगे हत्याकांडातील आरोपी असल्याचे समजते.

Amravati Murder
Amravati Cyber Fraud | अमरावती पोलिसांची आंतरराज्य कारवाई; १६.५३ लाखांच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश

आठ दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने मंथन ला एका प्रकरणात अटक केली होती. त्यांनतर तो जमानत वर बाहेर आला होता. शुक्रवारी सकाळी घटनेतील एका आरोपीने मंथनला मॅसेज करून वाळकी रोड वर बोलावले होते. मंथन साडेतीन वाजताच्या दरम्यान विना नंबरप्लेटच्या स्पोर्ट बाईक ने बोरनदी प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहचला. मात्र काही समजण्याच्या आतच चार जणांनी त्याला घेरून त्याच्या मानेवर,हातावर आणि पोटावर चाकूने वार केले.

मंथन रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडलेला असतांना रस्त्याने जाणार्‍या नागरिकांनी घटनेची माहिती नांदगाव पेठ पोलिसांना दिली. माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी पोहचली होती. परिसराची नाकाबंदी करून पंचनामा करण्यात आला. स.पो.आ. कैलास फुंडकर,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.प्राथमिक माहितीनुसार, मृतक मंथन पाळनकर हा काही दिवसांपूर्वी घडलेल्या यश रोडगे हत्याकांडातील आरोपी असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर यशच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशानेच मंथनची हत्या करण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू होती. 

Amravati Murder
Amravati Car Fire | अमरावतीत धावत्या कारला भीषण आग, प्रसंगावधानाने चालकाने केली सुखरूप सुटका

दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली असून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व प्रत्यक्षदर्शींच्या आधारे तपास वेगात सुरू आहे.

प्रवेशद्वारावर हत्या,धरणावर रासलीला

बोरनदी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर मंथनची हत्या होऊन परिसरात पोलीस छावणी उभी राहिली असतानाच, धरण परिसरात ४ ते ५ अल्पवयीन जोडप्यांची रासलीला सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत सर्वांना हुसकावून लावून समज दिली. हा परिसर अनैतिक कृत्यांचा अड्डा बनत असून दररोज शेकडो प्रेमीयुगल येथे येतात. यामुळे अनेक अनुचित घटना घडत असल्याचे वास्तव समोर येत आहे. 

मन्या उर्फ मंथन पाळनकर याच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला. मंथन ज्या वाहनाने घटनास्थळी आला होता त्या वाहनाच्या आधारे मालकाची माहिती घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत. हत्या करणार्‍या आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष पथक तयार करून रवाना करण्यात आले आहे. पोलिसांकडून तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल

. -दिनेश दहातोंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पो.स्टे. नांदगाव पेठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news