

Car Fire Daryapur Amravati
अमरावती : दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलिस स्टेशन हद्दीत येणार्या रामतीर्थ फाट्याजवळ एका धावत्या कारला भीषण आग लागली. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.१४) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली आहे. या आगीत चार चाकी वाहन पूर्णतः जळून खाक झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती समोर आली आहे.
कार चालक तत्काळ बाहेर निघाल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. घटनेतील चारचाकी कार ही अकोल्या जिल्ह्यातील असून वाहन चालक हा दर्यापूर तालुक्यातील जैनपूर येथे आपल्या नातेवाईकाकडे जात असल्याचे समजते. माहिती मिळताच दर्यापूर येथील नगरपालिकेचे अग्निशामक वाहन व पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यावर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.