MD drug case Amravati: MD प्रकरणातील कथित सूत्रधार मध्यप्रदेशातून जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई

पोलिसांनी वेषांतर करून त्याच्यावर पाळत ठेवली आणि योग्य संधी साधत २० ऑगस्ट रोजी मुलतानपूरा येथून त्याला ताब्यात घेतले
MD drug case Amravati: MD प्रकरणातील कथित सूत्रधार मध्यप्रदेशातून जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई
Published on
Updated on

अमरावती : शहरात २१४ ग्रॅम मेफेड्रान (एमडी) जप्त प्रकरणाच्या तपासाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील ड्रग्ज पुरवठ्याच्या साखळीतील कथित मुख्य सूत्रधार तौसिफ मल्का मंजूर मल्का याला अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ने मध्यप्रदेशातील मंदसौर येथून अटक केली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी वेषांतर करून सापळा रचला. २० ऑगस्ट रोजी मुलतानपूरा परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.

MD drug case Amravati: MD प्रकरणातील कथित सूत्रधार मध्यप्रदेशातून जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई
Amravati Crime | अमरावतीत अज्ञात हल्लेखोरांकडून सपासप वार करून तरुणाचा खून

नागपुरी गेट पोलीस ठाण्यात २३ जुलै रोजी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दशरथ आडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २१(क), २२(क) आणि २९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तपासाची सुरुवात करताना पोलिसांनी सईद खान वल्द शरीफ खान (वय ४१) याला २३ जुलै रोजी अटक केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील खजराणा येथून युनूस मोहम्मद रमजान (वय ४३) याला २८ जुलै रोजी २०.५ ग्रॅम एमडीसह अटक करण्यात आली.

MD drug case Amravati: MD प्रकरणातील कथित सूत्रधार मध्यप्रदेशातून जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई
Amravati Crime : अमरावतीत धक्कादायक घटना: पाठीत भोसकलेला चाकू तसाच... धामोरीत तरुणाची निघृण हत्या!

या दोन्ही आरोपींच्या चौकशीतून अमली पदार्थांच्या पुरवठ्याचे धागेदोरे मध्यप्रदेशापर्यंत पोहोचले. तपासादरम्यान तौसिफ मल्काचे नाव समोर आले. त्याच्या हालचालींवर तांत्रिक माहितीच्या आधारे लक्ष ठेवण्यात आले. तौसिफचा माग काढत गुन्हे शाखेचे पथक १९ ऑगस्ट रोजी मंदसौरला रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या परिसराची माहिती घेण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी वेषांतर करून त्याच्यावर पाळत ठेवली आणि योग्य संधी साधत २० ऑगस्ट रोजी मुलतानपूरा येथून त्याला ताब्यात घेतले.

MD drug case Amravati: MD प्रकरणातील कथित सूत्रधार मध्यप्रदेशातून जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई
Amravati Crime: 'तुमच्या खात्यात ६ लाख जमा झालेत..'; एका फोन कॉलने महिलेचे २.५९ लाख लुटले, नांदगाव खंडेश्वर पोलिसांत गुन्हा नोंद

तौसिफच्या अटकेमुळे अमरावतीत एमडीचा पुरवठा करणार्‍या साखळीतील महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्या चौकशीतून एमडीचा स्रोत, पुरवठ्याचे मार्ग आणि या रॅकेटमध्ये सहभागी अन्य व्यक्तींची माहिती पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपआयुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपआयुक्त प्रांजली सोनावणे आणि सहायक पोलीस आयुक्त निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी व अंमलदार तसेच सायबर पोलिसांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news