Amravati Crime | अमरावतीत अज्ञात हल्लेखोरांकडून सपासप वार करून तरुणाचा खून

सिटी कोतवाली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप
Youth Murdered Amravati
बापट चौक परिसरातील वाइन शॉपसमोर तरुणाचा खून झाल्यानंतर तपास करताना पोलीस Pudhari
Published on: 
Updated on: 

Youth Murdered Amravati

अमरावती : शहरातील बापट चौक परिसर रविवारी मध्यरात्री रक्तरंजित घटनेने हादरला. वाइन शॉपसमोर झालेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात लालखडी येथील शरीफ बेग रशीद बेग (वय २५) या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.२) रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी शरीफ बेग यांना गाठून त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालय इर्विनमध्ये हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

Youth Murdered Amravati
Amravati News | मेळघाटातील कुपोषण नियंत्रणासाठी उपाययोजना करणार -महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे!

घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. एसीपी, डीसीपी पथकासह घटनास्थळी आणि इर्विन रुग्णालयात पोहोचले. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी रुग्णालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

ही हत्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news