Amravati Crime : अमरावतीत धक्कादायक घटना: पाठीत भोसकलेला चाकू तसाच... धामोरीत तरुणाची निघृण हत्या!

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
Amravati Crime : अमरावतीत धक्कादायक घटना: पाठीत भोसकलेला चाकू तसाच... धामोरीत तरुणाची निघृण हत्या!
Published on
Updated on

अमरावती : खोलापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धामोरी गावात बुधवारी (दि. २९) रात्री एका तरुणाची चाकू भोसकून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.

गवंडी काम करणाऱ्या तरुणाचा खून

गोलू उर्फ राहुल राजू रावेकर (वय ३० वर्षे, रा. वाठोडा शुक्लेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो व्यवसायाने गवंडी काम करत होता. बुधवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास धामोरी भागात एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पाठीत रुतलेल्या स्थितीत आढळला सुरा

घटनेची माहिती मिळताच खोलापूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनूप वाकडे पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मृतदेहाच्या पाठीत सुरा तसाच रुतलेल्या स्थितीत आढळला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.

आरोपींचा शोध सुरू

ही हत्या का आणि कोणी केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस परिसरातील नागरिकांची चौकशी करत असून, परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची पाहणी केली जात आहे. अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच या गुन्ह्याचा उलगडा केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news