Amravati Election Result: अमरावतीत भाजपला मोठा धक्का! फडणवीसांचे मामेभाऊ विवेक कलोती पराभूत; काँग्रेसचे चार उमेदवार विजयी

AMC Election Result 2026: अमरावती महापालिका मतमोजणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती पराभूत झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
CM Fadnavis’ Cousin Vivek Kaloti Lose
CM Fadnavis’ Cousin Vivek Kaloti LosePudhari
Published on
Updated on

Amravati Municipal Election Result Vivek Kaloti Defeat: अमरावती महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांना अमरावतीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या निकालामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून भाजपसाठी ही धक्कादायक बातमी मानली जात आहे.

विवेक कलोती हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे नातेवाईक असल्याने त्यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष होतं. मात्र मतदारांनी वेगळा निर्णय दिला. त्यांच्याविरोधात झालेल्या लढतीत काँग्रेसने जोरदार बाजी मारली. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 14 मधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाल्यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे.

CM Fadnavis’ Cousin Vivek Kaloti Lose
BMC Election 2026 Result Live Update: मुलुंडमधील प्रभाग क्रमांक १०४ मधून भाजपाला मोठं यश; प्रकाश गंगाधरे विजयी

अमरावती महापालिकेत एकूण 87 जागा असून सत्तेसाठी 44 जागा मिळवणं आवश्यक आहे. सध्या कोणता पक्ष हा आकडा गाठतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अमरावतीत अनेक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढले, तर काहींनी आघाड्या करून मैदान गाजवलं. त्यामुळे निकाल शेवटच्या फेऱ्यांपर्यंत रंगतदार राहण्याची शक्यता आहे.

एकूणच, अमरावतीच्या मतमोजणीत विवेक कलोतींचा पराभव हा आजचा सर्वात जास्त चर्चेचा मुद्दा आहे. आता अंतिम निकालात अमरावतीची सत्ता कोणाच्या हाती जाते, हे पुढील काही तासांत स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news