Amaravati Crime News | अमरावती पाण्याच्या ड्रममध्ये आढळला महिलेचा मृतदेह

जाकिर कॉलनी येथील घटना, हत्या की आत्महत्या? संशय कायम : शरीरावर गंभीर जखमा
  suspicious dead body
प्रातिनिधिक छायाचित्र (File Photo)
Published on
Updated on

अमरावती : नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाकीर कॉलनीमध्ये एका महिलेचा (दि.२९) रक्तबंबाळ मृतदेह घरातील पाण्याच्या ड्रममध्ये आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव शाहिस्ता परविन आरिफ खान (वय ४८) असे आहे. या प्रकरणाने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

हत्या की आत्महत्या याबाबत संभ्रम कायम आहे.

मृत महिलेचा पती आरिफ खान याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो आपल्या मुलांसह घरी झोपलेला असताना पत्नीने घाबरलेल्या अवस्थेत स्वतःला खोलीत बंद करून घेतले होते. सकाळी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर शाहिस्ता परविनचा मृतदेह ड्रममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

महिलेच्या डोक्यावर व शरीरावर अनेक वार असल्याचे दिसून आले. त्यामुळे ही आत्महत्या असण्याची शक्यता कमी असून हत्या असण्याचा पोलिसांना संशय आहे. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले. पोलिसांकडून मृतक महिलेच्या नातेवाईकांची चौकशी सुरू आहे. अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष लागलेला नाही. घटनेनंतर जाकीर कॉलनीसह परिसरात वेगवेगळी चर्चा रंगली आहे. हत्या असल्यास आरोपी कोण? आणि हत्या का केली गेली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

  suspicious dead body
अमरावती : धारदार शस्त्राने गळा चिरून तरूणाची हत्या

मृतक महिलेच्या गळ्यावर, हातावर व शरीरातील इतर भागांवर घाव आहे. महिलेचा पती आसिफ खान भंगार विक्रेता आहे. बुधवारी रात्री आसिफ खान त्यांची पत्नी शाहिस्ता बी आणि दोन मुले जेवण करून झोपले होते. गुरुवारी पहाटे जेव्हा आसिफ खान झोपेतून उठले तर पत्नी शाहिस्ता बी त्यांना घरात कुठेच दिसली नाही. त्यांनी नातेवाईकांना पण विचारले. मात्र शाहिस्ता बी तिथेही नव्हती. शेवटी जेव्हा ते घरातील तिसर्‍या रूम मध्ये गेले तिथे त्यांना पाण्याचे ड्रमजवळ रक्त दिसले.

त्यांनी जेव्हा ड्रममध्ये पाहिले तर रक्ताने माखलेला शाहिस्ता बीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. हे पाहून आसिफ खान यांना धक्का बसला. स्वतःला सावरत त्यांनी घटनेची माहिती नागपूर गेट पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. शाहिस्ताबीच्या गळ्यावर ,हातावर व इतर ठिकाणी घाव किंवा जखमा दिसल्याने पोलीस त्या दिशेने तपास करत आहे.

  suspicious dead body
अमरावती : तेरा वर्षीय विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये सापडली पिस्तुल, शाळेत खळबळ

डीसीपी पाटील घटनास्थळावर

घटनेची माहिती मिळताच नागपूर गेट पोलीसांसह पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक आयुक्त अरुण पाटील, फिंगरप्रिंट एक्सपर्ट घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिसराचे निरीक्षण करून कर्मचार्‍यांना आवश्यक दिशा निर्देश दिले. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news