अमरावती : पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; छत्री तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

अमरावती : पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; छत्री तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: शहरालगत असलेल्या छत्री तलाव येथे पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.१७) घडली. शेख उमर (वय १९) आणि अयान शेखजीत शहा (वय १६) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघेही तरुण शहरातील कुंभारवाडा परिसरातील रहिवासी आहेत.

ईदचा उत्सव साजरा करण्यासाठी ते छत्री तलाव परिसरात फिरायला गेले होते. दरम्यान शेख उमर याला पाण्यात पोहण्याचा मोह झाल्याने त्याने तलावात उडी घेतली. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी अयान शहा याने देखील छत्री तलावात उडी घेतली. मात्र दोघेही पाण्यातून बाहेर येण्यास अपयशी ठरले. त्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस व डीडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दुपारी तीनच्या सुमारास डीडीआरएफच्या पथकाने दोन्ही तरुणांचे मृतदेह तासाभरानंतर बाहेर काढले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. दरम्यान या घटनेमुळे कुंभारवाडा परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news