Amravati : आर्थिक संघर्ष असह्य! आईने १२ वर्षाच्या मुलासह संपविले जीवन | पुढारी

Amravati : आर्थिक संघर्ष असह्य! आईने १२ वर्षाच्या मुलासह संपविले जीवन

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : पतीच्या निधनाने आयुष्यातील आर्थिक संघर्ष असह्य झाल्यानंतर बारा वर्षाच्या मुलासह आईने टोकाचे पाऊल उचलत जीवन यात्रा संपवली. मन हेलावून टाकणारी ही घटना अमरावतीमधील हमालपुरा येथे घडली. विष प्राशन करून दोघांनीही जीवन संपवले. योगिता गजानन वाघाडे (वय ३५) आणि अथर्व गजानन वाघाडे (वय १२) असे मृत आई आणि मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगिताच्या पतीचे वर्षभरापूर्वी आजाराने निधन झाले होते. ती आपल्या मुलाचा सांभाळ करुन जगण्यासाठी संघर्ष करीत होती. मंगळवारी योगिता व तिचा मुलगा दिसत नसल्यामुळे शेजाऱ्यांनी घरात पाहिले. योगिताच्या तोंडातून फेस गळत होता. ती अत्यावस्थ असल्यामुळे नागरिकांनी तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. यावेळी सोबत मुलगा अथर्व देखील होता. योगितावर उपचार सुरू असतानाच अथर्वला देखील चक्कर यायला लागली आणि तो खाली कोसळला. आईने मला देखील काहीतरी प्यायला दिले होते असे त्याने सांगितले. त्यामुळे त्याच्यावरही उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच आई आणि मुलाचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे हमालपुरा परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :

 

Back to top button