अमरावती, पुढारी वृत्तसेवा : भारतीय डाक विभागामार्फत आयोजित देशव्यापी विशेष सुकन्या अभियानांतर्गत अमरावती (Amravati Postal Division )) डाक विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.. तिवसा तालुक्यातील 'मोझरी' हे गाव 'संपूर्ण सुकन्या ग्राम' घोषित करण्यात आले आहे. म्हणजेच या गावातील सर्व मुलींचे सुकन्या खाते उघडण्यात आलेले आहेत. हे अभियान ९ व १० फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतभर डाक विभागामार्फत राबविण्यात आले होते. या दरम्यान अमरावती डाक विभागाने तब्बल ७ हजार ८२७ सुकन्या समृध्दी खाते उघडली. अमरावती डाक विभागाने राज्यासह देश पातळीवरही उत्कृष्ट कामगिरी केली. अमरावती जिल्हाचा देशपातळीवर चौथा क्रमांक आला.