अकोला : गणेशोत्सवानिमित्त अकोल्यामध्ये वाहतुकीत बदल

जाणून घ्या कोणकोणत्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे
Traffic changes in Akolya on the occasion of Ganeshotsav
गणेशोत्सवानिमित्त अकोल्यामध्ये वाहतुकीत बदल Pudhari Photo
Published on
Updated on

गणेशोत्सवानिमित्त शहर व जिल्ह्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी तसा आदेश जारी केला.आदेशाप्रमाणे, दि. 17 सप्टेंबर रोजी अकोला शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील वाहतूक सकाळी 6 वा. पासून दुस-या दिवशी स. 6 पर्यंत, अकोला- अकोट राज्य मार्गावरील वाहतूक सकाळी 6 पासून दुस-या दिवशी दु. 12 पर्यंत आणि अकोला- पारस फाटा ते बाळापूर मार्गावरील वाहतूक सकाळी 6 पासून दुस-या दिवशी दु. 12 पर्यंत वळविण्यात येईल.

Traffic changes in Akolya on the occasion of Ganeshotsav
Mumbai Traffic Issue| रिगल जंक्शन, काळाघोडा परिसरातील वाहतुकीत बदल

पर्यायी मार्ग अकोला जुने शहरातील

डाबकी रस्ता, जुन्या शहराकडून विठ्ठल मंदिर, कोतवाली चौक मार्गे बसस्थानकाकडे येणारी आणि डाबकी रस्त्याकडून भीमनगर, मामा बेकरीकडे येणारी वाहतूक या कालावधीत भांडपुरा चौक- पोळा चौक- हरिहरपेठ- वाशिम बायपास चौक- हायवेवरून लक्झरी बसस्थानक ते अशोक वाटिका व अकोला बसस्थानकाकडे वळविण्यात येईल. अकोला बसस्थानकाकडून हरिहरपेठेकडे जाण्यासाठी अशोक वाटिका- लक्झरी बसस्थानक- वाशिम बायपास असा मार्ग असेल. रेल्वे ओव्हर ब्रिजकडून कोतवाली चौकातून लक्झरी बसस्थानकाकडे जाणारी वाहतूक रेल्वे स्थानक चौकाकडून अग्रसेन चौकातून उड्डाण पुलावरून जेल चौक व लक्झरी बसस्थानकाकडे वळविण्यात येईल. लक्झरी बसस्थानकाकडून अकोट स्टॅंडकडे जाण्यासाठी जेल चौक- उड्डाण पुलावरून जावे लागेल. सुभाष चौकाकडून गांधी चौकाकडे जाण्यासाठी दामले चौकाकडून टॉवर चौक व अंडरपासमधून जावे लागेल.

अकोला- अकोट मार्गावरील वाहतूक`

अकोट ते अकोला मार्गावरील वाहतूक अकोला बसस्थानकापासन अशोक वाटिकेवरून वाशिम बायपास- शेगाव टी पॉईंट- गायगाव- देवरी अशी वळविण्यात येईल. अकोल्यावरून म्हैसांग, दर्यापूरकडे जाणारी वाहतूक टॉवर चौकातून रेल्वेस्थानक- सातव चौक मार्गे न्यू तापडियानगर, खरप टी पॉईंटवरून म्हैसांग अशी वळविण्यात येईल.

Traffic changes in Akolya on the occasion of Ganeshotsav
नगर : उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल

पारस फाटा- बाळापूर- खामगाव मार्गावरील वाहतूक

अकोल्याहून पारस फाटा- बाळापूरकडे जाणारी वाहतूक हायवे ट्रॅप कार्यालयाकडून वळविण्यात येईल. खामगावकडून पारस फाटा- बाळापूर- पातूरकडे जाणारी वाहतूक खामगाव- पारस फाटा- वाशिम बायपास चौक- पातूर याचमार्गे वळविण्यात येईल. अकोला- पारस फाटा मार्गे खामगावकडे जाणारी वाहतूक अकोला- पारस फाट्याजवळील रोशन ढाब्याजवळून वळवून खामगाव ते अकोला मार्गावरील तपे हनुमान मंदिराजवळील डिव्हायडर बॅरिकेटिंगपर्यंत वळविण्यात येईल. या बदलानुसार नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news