नगर : पुढारी वृत्तसेवा: शहरातील शक्कर चौक ते जीपीओ चौक या दरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर असल्याने शहरातील इंम्पेरिअल चौक ते शक्कर चौक दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबत हकरती असल्यास नागरिकांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेत उपस्थित राहून किंवा ई-मेलद्वारे 10 जून 2022 पर्यंत नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
पुणेकडून औरंगाबादकडे जाणारे वाहतुकीकरिता मार्ग सक्कर चौक- टिळक रोड- आयुर्वेदिक कॉलेज कॉर्नर-राज पॅलेस रोड- स्वस्तिक चौक मार्गे औरंगाबादकडे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. नेप्ती नाका- टिळक रोडने पुणे-औरंगाबादकडे जाणारी वाहतूक नेप्ती नाका-आयुर्वेदिक कॉलेज कॉर्नर -राज पॅलेस रोड स्वस्तिक चौक मार्गे सुरू करण्यात आली आहे. अहमदनगर रेल्वे स्टेशनकडून पुणे-औरंगाबाद कडे जाणारी वाहतूक शक्कर- चौक टिळक रोड -आयुर्वेदिक कॉलेज कॉर्नर- राज पॅलेस रोड स्वस्तिक चौक मार्गे औरंगाबादकडे जाईल. तसेच अहमदनगर रेल्वे स्टेशन -कायनेटिक चौक मार्गे पुण्याकडे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. औरंगाबाद कडून पुणेकडे जाणारे वाहतूक इंम्पेरिअल चौक – चाणक्य चौक – आनंदऋषीजी हॉस्पीटल रोड- शक्कर चौक मार्गे पुणे तसेच ज्या वाहनचालकांना शक्कर चौक येथुन अहमदनगर रेल्वे स्टेशनकडे जायचे असेल त्यांनी कायनेटीक चौक मार्गे रेल्वे स्टेशनकडे जाणारे मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.