

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडी हातबल झाली असून त्यांनी विरोधकांचा अपप्रचार सुरु केला आहे. त्यामुळे त्यांच्या अपप्रचाराला ठोसपणे उत्तर द्या. तसेच विधानसभा निवडणुकीत आपल्या मतदान केंद्रावर मतदाराला घेवून जावून महाराष्ट्रात महायुतीच सरकार स्थापनेचा संकल्प घेऊन कामाला लागा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना केले. अकोला येथे ते ग्रामीण आणि महानगर जिल्हा विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते.
महाविकास आघाडीकडे निवडणुकीसाठी कोणतेही मुद्दे नसल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या विरोधात ते अपप्रचार करत आहेत. ज्यांना पैशाचं मूल्य कळत नाही ते मातृ शक्तीचा अपमान करत आहेत. सर्वसामान्यांच्या वेदना जाणणाऱ्या मातृशक्ती यांना पंधराशे रुपये तसेच मोफत तीन सिलेंडर ही योजना तसेच एसटीमध्ये 50% सवलत दिलेली त्यांना सहन होत नाही . त्यामुळे दररोज महाराष्ट्राचा अपमान करण्याचे काम महाविकास आघाडीचे नेते करीत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना केला.
आम्ही विदर्भाच्या विकासासाठी तसेच विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या सिंचनाची व्यवस्थेसाठी महायुती सरकार कटिबद्ध असून महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकार सदैव तत्पर राहणार आहे. शेतकरी युवा, तसेच राष्ट्रपुरुषांचा सन्मान ही परंपरा जपत आहे. महायुतीतील भारतीय जनता पार्टीसह सहयोगी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या फेक नरेटीव्ह पासून सावध राहा. पोलखोल या अभियानांमध्ये सहभागी होत केवळ दोन महिने पक्षासाठी द्या. कार्यकर्ता हीच भारतीय जनता पक्षाची ताकद असल्याचे सांगून आगामी विधानसभेमध्ये अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अकोला पूर्व, अकोला पश्चिम आणि बाळापुर विधानसभा क्षेत्रातील अनेक युवकांनी पक्ष प्रवेश केला.
या कार्यकारणीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर हे होते. मंचावर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. आमदार संजय कुटे, खासदार अनुप धोत्रे ,आमदार आकाश फुंडकर, वसंत खंडेलवाल,हरीश पिंपळे ,प्रकाश भारसाकळे,माजी मंत्री डॉ.रणजीत पाटील, नारायणराव गव्हाणकर विजय अग्रवाल बळीराम सिरस्कार, जयंत मसने, अर्चनाताई मसने वैशालीताई निकम ,चंदाताई शर्मा कृष्णा शर्मा , वाशिम जिल्हा अध्यक्ष शाम बडे, आदी उपस्थित होते.