Friendship Day Tweet : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मैत्रीवरील अमृता फडणवीस यांचे सूचक ट्विट चर्चेत

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मैत्रीवरील अमृता फडणवीस यांचे सूचक ट्विट चर्चेत
Friendship Day Tweet
Friendship Day Tweet : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मैत्रीवरील अमृता फडणवीस यांचे सूचक ट्विट चर्चेतFriendship Day Tweet
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा सोबतचा फोटो ट्विट (Friendship Day Twee) करत शेअर केला आहे. तो फोटो ट्विट करत "ये दोस्ती हम नही तोड़ेंगे; महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत " असे ट्विट त्‍यांनी केल्‍याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

काय आहे ट्विटमध्ये?

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर सक्रिय असतात. आज मैत्री दिनानिमित्त त्यांनी पती व उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे दोन फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे. या फोटोंना कॅप्शन दिले आहे की, "ये दोस्ती हम नही तोड़ेंगे…; महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत ". व एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. त्याचबरोबर #FriendshipDay2022 #Friends #friendship #FriendsForever #sundayvibes हे हॅशटॅग दिले आहेत.

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्यानंतर महाराष्ट्रच्या राजकारणाला एक वेगळे वळण मिळले. भाजपशी युती करत ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली; पण महाराष्ट्रातील राजकारण दिवसेंदिवस ढवळत गेले. आरोप-प्रत्यारोप होत गेले. आज मैत्री दिनानिमीत्त अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news