Ganesh Visarjan | गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने आपत्‍ती व्‍यवस्‍थापन बचाव पथक सज्‍ज

Tahsildar Guidance | नदी गांधीग्राम येथे तहसीलदार अकोला यांचे मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथक बोट व बचाव साहीत्‍यासह सज्‍ज ठेवण्‍यात आले आहे.
Ganesh Visarjan
शोध व बचाव पथक बोट व बचाव साहीत्‍यासह सज्‍ज ठेवण्‍यात आले आहे.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

अकोला : गणेश विसर्जनाच्‍या अनुषंगाने 6 सप्टेंबर रोजी नदी व बंधा-याच्‍या ठिकाणी शोध व बचाव पथक सज्‍ज ठेवण्‍यात येत आहेत. त्‍यानुसार पुर्णा नदी गांधीग्राम येथे तहसीलदार अकोला यांचे मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथक बोट व बचाव साहीत्‍यासह सज्‍ज ठेवण्‍यात आले आहे.

या पथकामध्‍ये सुनिल कल्‍ले, तलाठी दिपक राउत, उमेश आटोटे, मनिष मेश्राम, गौतम मोहोड, प्रदीप मोहोडव वंदे मातरम शोध व बचाव पथक सदर उपस्थित आहेत.

Ganesh Visarjan
Akola News | काटेपूर्णा प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना इशारा

तसेच मन नदी भिकुंड बंधारा ता.बाळापुर येथे तहसीलदार बाळापुर यांचे मार्गर्शनामध्‍ये बोट व बचाव साहित्‍यासह बचाव पथक उपस्थित आहे. सदर पथकाममध्‍ये मंडळ अधिकारी प्रशांत सायरे, दिपक सदाफळे, विजय माल्‍टे, योगेश विजयकर इत्‍यादी सदस्‍य उपस्थित आहेत.

Ganesh Visarjan
Akola News |शेतकऱ्यांना होणार दिवसा वीजपुरवठा : अकोला जिल्ह्यातील सौर प्रकल्पांना वेग; १२ प्रकल्प कार्यान्वित

पोपटखेड प्रकल्‍प ता. अकोट येथे विर एकलब्‍य बचाव पथक पथक सज्‍ज राहील. काटेपुर्णा नदी कुरणखेड येथे मॉं चंडीका आपत्‍कालिन पथक पैलपाडा सज्‍ज आहे. जिल्‍हयातील नागरीकांना गणेश विसर्जनाच्‍या अनुषंगाने नदी/नाला/तलाव/बंधारा येथे आवश्‍यक दक्षता घेण्‍याबाबत आवाहन जिल्‍हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news