

Katepurna project gates open
अकोला : काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज (दि. 5) दुपारी 3.00 वाजता काटेपूर्णा प्रकल्पाचे 8 द्वारे 60 सें.मी.उंचीने उघडून एकूण 384.46 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याच्या येव्या नुसार सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये कमी जास्त प्रमाणात आवश्यक बदल करण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे. तसेच नदी पात्र ओलांडू नये. नदीकाठावरील गावांना आपल्या स्तरावरून सतर्क करण्यात यावे, अशा सूचना काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.
सततच्या पावसामुळे शेती मशागत शक्य नसल्यामुळे सोयाबीन पीकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव, लष्करी आणि इतर अळ्यांचे प्रमाण वाढले आहे .त्यातच हिरव्या सोयाबीन वर येलो मोझाक आल्याने यासंदर्भात अकोला तालुका कृषी विभागाच्या वतीने शास्त्रज्ञासह बोरगाव मंजू परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या 16 ऑगस्ट पासून अतिवृष्टी नंतर जिल्ह्यात पावसाची सततधार सुरू असून,पिकांची आंतर मशागत आणि फवारण्या करणे कठीण झाले आहे. अतिपावसामूळे सोयाबीन कापूस पीक पाण्याखाली गेले आहे. विविध अळ्यांच्या प्रादुर्भावासह, बुरशीजन्य रोग, सोयाबीन पिवळे पडणे, यलो मोझाक मुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णता अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत कृषी विभागाची संपूर्ण टीम कामाला लागली असून बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि धीर देण्याचे काम कृषी विभागा कडून करण्यात येत आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्यासह, अकोल्याचे तालुका कृषी अधिकारी विलास वाशीमकार, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रकाश घाटोळ, डॉ.श्रीकांत ब्राम्हणकर, डॉ.पी.के.राठोड, उपकृषी अधिकारी मनीषा जोशी,सहायक कृषी अधिकारी संजय जाधव, अजय देशमुख यांनी बोरगाव मंजू परिसरातील अनवी, मिर्झापुर, राजापूर, पैलपाडा परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील लोकप्रतिनिधी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.