अकोला: जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस

अकोला: जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस
Published on: 
Updated on: 
अकोला: पुढारी वृत्तसेवा :  भारतीय हवामान विभागाच्या नागपूर येथील केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यात दि. 11 ते 16 जूनदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान वा-याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असेल, असा अंदाज आहे.
नागरिकांनी वादळाच्या स्थितीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. झाडाखाली थांबू नये. वीज चमकत असताना मोबाईल, वीजेची उपकरणे बंद ठेवावी. वाहने वीजेचा खांब व झाडे यापासून दूर ठेवावीत, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने केली आहे.
हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news