मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात अकोला जिल्हा राज्यात दुसरा

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात अकोला जिल्हा राज्यात दुसरा
Published on
Updated on

अकोला, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात अकोला जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हा उद्योग केंद्रातर्फे दि. 20 जून रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अजित कुंभार असतील. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात 726 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट होते. अकोला जिल्ह्यामध्ये उद्दिष्टांपेक्षा अधिक 36 कोटी 59 लक्ष निधीतून 961 प्रकरणे मंजूर करण्यात आली. जिल्हा सहकारी बँकेने 250, स्टेट बँक ऑफ इंडियाने 124, बँक ऑफ महाराष्ट्रने 111, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 133, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने 68, युनियन बँक ऑफ इंडियाने 65, बँक ऑफ इंडियाने 42, कॅनरा बँकेने 39 व बँक ऑफ बडोदाने 41 प्रकरणे मंजूर केली. बँकांच्या या सहकार्य आणि कामगिरीबद्दल जिल्हा उद्योग केंद्रातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news