याबाबत अधिक माहिती अशी की, भास्कर राऊत (रा. पणजहे) हे त्यांच्या पत्नी सविता राऊत यांच्यासह हिवरखेडवरून अकोटकडे दुचाकीवरून जात होते. दरम्यान, पाठीमागून त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात सविता राऊत या जागीच ठार झाल्या. तर भास्कर राऊत गंभीर जखमी झाले आहेत.