अकोला: राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ५९५ प्रकरणे निकाली

अकोला: राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ५९५ प्रकरणे निकाली
अकोला, पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील सर्व न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ७ हजार ५९५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. व १४ कोटी ७५ लाख १६ हजार १९४ रूपयांची तडजोड झाली. राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. तिवारी यांच्या मार्गदर्शनात सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालये, तसेच कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय व जिल्हा ग्राहक तकार आयोग येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.
त्यात प्रलंबित प्रकरणापैकी एकूण १० हजार ७३३ प्रकरणे  तडजोडीकरिता ठेवण्यात आली होती. त्यापैकी १ हजार ६८० प्रलंबित व ५ हजार ९१५ दाखलपूर्व प्रकरणात समेट घडून आला. अशी एकूण ७ हजार ५९५ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
मुख्यत्वे दिवाणी, फौजदारी, वैवाहिक वाद स्वरूपाची, तसेच मोटार वाहन अपघात प्रकरण व कलम १३८ एन. आय अॅक्ट आणि ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी, तसेच महावितरण व बँकांची खटलापूर्व प्रकरणात तडजोड होऊन रक्कम रूपये १४ कोटी ७५ लाख १६ हजार १९४ रूपयांची तडजोड झाली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक व्ही. डी. उबाळे, संजय व्ही. रामटेके, राजेश देशमुख,  हरिष इंगळे, शाहबाज खान यांनी परिश्रम घेतले. अकोला बार असोसिएशन, तसेच पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यांचे सहकार्य लाभले.
हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news