PM Suryoday Yojana 2024 : पंतप्रधान सूर्योदय योजनेत अकोलासह ७ जिल्ह्यांची निवड | पुढारी

PM Suryoday Yojana 2024 : पंतप्रधान सूर्योदय योजनेत अकोलासह ७ जिल्ह्यांची निवड

अकोला, पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान सुर्योदय योजनेच्या पहिल्या टप्पामध्ये राज्यातील ७ जिल्ह्यांची निवड झाली आहे. यामध्ये विदर्भातून नागपूर आणि अकोला जिल्ह्याचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत २५ हजार सोलार बसवण्याचे उद्दिष्ट आहे. योजनेत ४० टक्के अनुदान लाभार्थीना मिळणार आहे. ही सुविधा प्रधानमंत्री सूर्योदय योजनेंतर्गत दिली जाणार आहे. PM Suryoday Yojana 2024

राज्यात छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अकोला, पुणे, नाशिक, नांदेड, लातूर जिल्ह्याची योजनेत निवड झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून १ कोटी अल्प-मध्यम उत्पन्न असलेल्या नागरिकांच्या छतावर सौर पॅनल बसवले जातील. हे पॅनल सूर्यप्रकाशात चार्ज होतील आणि ग्राहकांच्या घरात वीज पुरवतील, यामुळे विजेचा वापर कमी होईल, तर वीज कनेक्शनसाठी नोंदणी करण्यापासून ते बिल भरण्यापर्यंतच्या समस्यांपासून वीज ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. PM Suryoday Yojana 2024

PM Suryoday Yojana 2024  सरकार देणार अनुदान –

१ केव्ही १८ हजार अनुदान, २ केव्हीसाठी ३६ हजार अनुदान, ३ केव्हीसाठी ५४ हजार अनुदान देण्यात येणार आहे. या प्लांटचे अंदाजे आयुष्य २५ वर्षे आहे.

हेही वाचा 

Back to top button