

अकोला: जिल्ह्यातील 23 वाळू घाटांचा लिलाव यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. या 23 घाटांपैकी 20 घाटांच्या लिलावाला प्रथम मुदतवाढ देण्यात आली आहे.
या 20 घाटांच्या ई-लिलावाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, शुद्धीपत्रक निर्मगित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लिलावधारकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार ई- निविदा ऑनलाईन स्वीकारण्याची मुदत दि. 9 डिसेंबर रोजी दु. 2 वा. पर्यंत वाढविण्यात आली आहे. ई-निविदा (तांत्रिक लिफाफा) उघडणे, तांत्रिक पडताळणी आदी प्रक्रिया सुधारित वेळापत्रकानुसार दि. 10 डिसेंबर रोजी करण्यात येईल.
ई- लिलाव प्रक्रिया (ई-ऑक्शन) दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. पासून दु. 1 वा. पर्यंत पूर्ण करण्यात येईल. अधिकाधिक लिलावधारकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रक शासनाच्या महाटेंडर्स, तसेच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील एकूण 20 वाळूघाट
मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी-2, वीरवाडा, दापुरा-2, कोळसरा-1, खापरवाडा-1, खापरवाडा-2 (खैरी), दुर्गवाडा, लोणसणा, सांगवामेळ, सांगवी, बपोरी, पिंगळा दापुरा या घाटांचा समावेश आहे. बाळापूर तालुक्यातील काजीखेड, काजीखेड-2 हिंगणा शिकारी, मोखा, स्वरूपखेड, जानोरीमेळ, त्याचप्रमाणे, तेल्हारा तालुक्यातील तळेगाव पातुर्डा, वांगरगाव व बाभूळगाव या घाटांचा समावेश आहे.