Jintur Municipal Election | जिंतूर नगर परिषद निवडणूक : 'असूद्या कितीही काम धाम'; घोषणा, कविता, गीतांच्या माध्यमातून मतदानाचे आवाहन

निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या सूचनेनुसार आयोजन
Jintur Voter awareness campaign
जिंतूरमध्ये कामात व्यस्त असणाऱ्या लोकांसाठी मतदार जनजागृती करण्यात आली.Pudhari
Published on
Updated on

Jintur Voter awareness campaign

जिंतूर : जिंतूर नगर परिषद क्षेत्रात गर्दीने भरलेल्या भागांमध्ये विशेषत: शहरातील खाजगी वाहन चालक, रिक्षाचालक, भाजी मंडई मधील भाजी विक्रेते, फळ विक्रेते व किरकोळ व्यापारी यांच्यासारख्या कायम कामात व्यस्त असणाऱ्या लोकांसाठी मतदार जनजागृती करण्यात आली. स्वीप पथकाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम व उपक्रमाचे, आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज हा विशेष उपक्रम जिंतूर शहरात राबविण्यात आला.

घोषणा, कविता, गीत यांच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. आपण कामामध्ये व्यस्त असणारी मंडळी आहात तरीही मतदान करणे पहिले काम हे लक्षात घेऊन सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. अशा प्रकारचे प्रबोधन तालुकास्तरीय स्वीप पथकाचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी केले.

Jintur Voter awareness campaign
संभाजीनगर-परभणी दुहेरीकरणाच्या जमीन अधिग्रहणासाठी नोटीस

असूद्या कितीही काम धाम,

मतदान करणे पहिले काम .....

मतदार राजा जागा हो

लोकशाहीचा धागा हो .....

शंभर टक्के मतदान

लोकशाही होईल बलवान....

यासारखी घोषवाक्यांनी परिसर दुमदुमून गेला. स्वीप पथकातील सदस्य साहित्यिक मयूर जोशी यांनी आपल्या स्वरचित “मतदान आमचा हक्क आहे आम्ही तो बजावणार...” या गीताने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपविभागीय अधिकारी सेलू तथा निवडणूक निर्णय अधिकारी जिंतूर नगर परिषद शैलेश लाहोटी, तहसीलदार जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरवदे, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, उपमुख्याधिकारी अनिल समिंद्रे, नायब तहसीलदार निवडणूक सुग्रीव मुंढे, मिडिया पथक प्रमुख नायब तहसीलदार प्रशांत राखे, गटशिक्षणाधिकारी तथा मतदान जनजागृती पथक प्रमुख त्र्यंबक पोले यांच्या नियोजनानुसार मतदार जनजागृती कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

Jintur Voter awareness campaign
Parbhani Hospital News | परभणी जिल्हा रुग्णालयात आयसीयू अंधारात; वीज व इन्व्हर्टर दोन्ही ठप्प

मतदार जनजागृती अभियान यासाठी भोंगा व जनजागृती बॅनर असलेले फिरते वाहन तयार करण्यात आले आहे. या वाहनाच्या माध्यमातून जिंतूर नगर परिषदेच्या विविध भागांमध्ये मतदार जनजागृती पथकाद्वारे जनजागृती केली जात आहे. मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा या संदर्भात प्रबोधन केले जात आहे.

त्याप्रमाणे जिंतूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व मतदारांनी उत्सव लोकशाहीचा, अभिमान देशाचा अशी भावना मनात ठेवून दिनांक 02/12/2025 रोजी सकाळी 07:30 ते संध्याकाळी 05:30 या वेळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, अशा प्रकारचे प्रबोधन तालुकास्तरीय मतदार जनजागृती व सहभाग कार्यक्रमाचे पथक सदस्य राजेंद्र ढाकणे, दिनकर घुगे, मारोती घुगे, प्रवीण घुले, लक्ष्मण टाकणसार, हनुमान गायकवाड, योगेश देशमुख यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news