Lok Sabha elections 2024 : निवडणूक काळात संशयास्पद आर्थिक व्यवहारावर राहणार नजर | पुढारी

Lok Sabha elections 2024 : निवडणूक काळात संशयास्पद आर्थिक व्यवहारावर राहणार नजर

अकोला, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी बँकांनी संशयास्पद आर्थिक व्यवहारावर (suspicious transaction reports) नजर ठेवून तत्काळ माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील बँकर्सची बैठक नियोजनभवनात झाली, यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा आदी उपस्थित होते.

आचारसंहिता कालावधीत बँकांची भूमिका महत्वाची आहे. निवडणूक काळात बँकांना रोज संशयास्पद व्यवहार अहवाल (एसटीआर) (suspicious transaction reports) सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने बँकांना दिले आहेत. बँकांमार्फत असे व्यवहार होत आहेत किंवा कसे, एखाद्या शाखेत अचानक पैशाची मागणी वाढल्यास त्यावर नजर ठेवावी. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना व आदेशांबाबत यापूर्वीही बँकांना माहिती देण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान लोकसभा मतदारसंघात कुठेही पैशाचा गैरवापर होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाच्या प्रत्येक आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

हेही वाचा : 

Back to top button