अकोला : जलयुक्त शिवार अभियान २.१ मध्ये १३१ गावांची निवड

अकोला :  जलयुक्त शिवार अभियान २.१ मध्ये १३१ गावांची निवड
Published on
Updated on

अकोला, पुढारी वृत्तसेवा : मृद व जलसंधारण विभागाच्या निर्देशानुसार जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जलयुक्त शिवार समितीव्दारे निकषानुसार पात्र गावांची निवड करण्यात आली आहे. निवड केलेल्या १३१ गावांना आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली आहे. निवड झालेल्या गावांचा अंतिम आराखडा करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधित विभागांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियान अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता हरिभाऊ गिते, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणाचे वरिष्ठ भुवैक्षणिक एन.बी.इंगळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मुरली इंगळे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी तथा सदस्य सचिव, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी बैठकीत निर्देश दिले की, गाव आराखडा शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणेच तयार करावा. मृद व जलसंधारणाच्या कामात खाजगी, अशासकीय संस्था तसेच लोकसहभाग घ्यावा. तसेच जलयुक्त शिवार अभियानातर्गंत निवड झालेल्या गावांचे सुक्ष्म नियोजन करुन अंतिम आराखडा तयार करावा, असेही निर्देश यावेळी दिले.

या गावांचा समावेश

बार्शी टाकळी : सारकीन्ही,चेलका,बोरमळी,निंबी, जामवसू, रूस्तमाबाद, सेवानगर, धाबा, मांडोली, शेलगांव, कान्हेरी (सरप), कासारखेड,चिंचखेड,पाराभवानी, मोऱ्हळ,घोटा,धारागीरी,सावरखेड, धाकली (19 गावे)

अकोला : कापशी रोड, बोंदरखेड, चांगेफळ, म्हैसपुर, चांदुर, आगर, माझोड, चिखलगाव, गोरेगाव बु., निंबी मालोकर, देवळी, टाकळी पोटे, जवळा खु.,घोंगा, सोनाळा, बोरगांव मंजू, येळवन (17 गावे)

मुर्तिजापुर : पिंपळशेंडा, मोहखेड, आरखेड, लोधीपुर, बाळापुर, हमिदपुर, अलादपुर, गोपाळपुर, मिरापुर, किनखेड, शिवण खु., रामखेड, बहादरपुर, गोरेगाव,सलतवाडा,कादवी,कासवी, चिखली, भगोरा, धानोरा वैद्य, अनभोरा, सोनोरी, किन्ही, शेणी, फणी, जितापुर नाकट, खरबढोरे (27 गावे)

अकोट : अकोलखेड, आलेगाव, अंबोडा, बोचरा, खुदवंतपुर, शहापुर प्र. अकोट, शहापुर प्र.कार्ला, शेरी बुज्रूक, वडाळी देशमुख, वाघोडा, वणी, वासाळी नागापुर, नर्व्हरी खुर्द, औरंगाबाद प्र. अकोट, अमिनापूर, चिंचखेड खुर्द, धामणगाव, लोहारी खुर्द, लोहारी बुज्रूक, बोर्डी, उमरा, चिंचखेड बुज्रूक, दहीखेल फुटकळ ( 23 गावे)

तेल्हारा : चांगलवाडी,नापुर,हयातपुर,हिंगणा खुर्द, इसापुर, जाफ्रापूर, मालेगाव बाजार, मोलेगाव प्र. अडगाव, शेरी खुर्द, शेरी प्र. वडनेर, वारी आदमपुर, वारी भैरव गड, कोठा, शिवाजी नगर, खंडाळा,मोराडी,दिवानझरी,चिचारी,चंदनपुर,भिली,बोरव्हा,चिपी,सदरपुर,चित्तलवाडी (24 गावे)

बाळापुर : सांगवी जोमदेव, बटवाडी खु.,बटवाडी बु.,मांडवा खु.,पिंपळगाव ,तांदळी तर्फे तुलंगा, चिंचोली गणु, तामसी (8 गावे)

पातुर : खापरखेडा, दिग्रस खु, पातुर जिरायत भाग-2, पातुर जिरायत भाग-3, हिंगणा (उजाडे), गोळेगाव, जांब, पाचरण, चीचखेड-पिंपळखुटा, पिंपळडोळी, चोंढी, वरणगाव, डोलारखेड (13 गावे)

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news