अमृतपाल सिंग याला ‘भिंद्रनवाले 2.0’ म्‍हणून प्रमोट करण्‍यासाठी ‘आयएसआय’चे फडिंग : सुरक्षा संस्‍थांना संशय | पुढारी

अमृतपाल सिंग याला 'भिंद्रनवाले 2.0' म्‍हणून प्रमोट करण्‍यासाठी 'आयएसआय'चे फडिंग : सुरक्षा संस्‍थांना संशय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क  : स्‍वयंघोषित खलिस्‍तानी नेता अमृतपाल सिंग याला सोशल मीडियावर भिंद्रनवाले २.० म्‍हणून प्रमोट करण्‍यासाठी पाकिस्‍तानच्‍या ‘आयएसआय’कडून आर्थिक रसद पुरवली जात असावी, असा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्‍यक्‍त केला आहे.

याबाबत ‘इंडिया टूडे’ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटले आहे की, खलिस्तानी नेता आणि ‘वारिस पंजाब’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग यांना सोशल मीडियावर भिंद्रनवाले 0.2 म्हणून प्रमोट करण्यासाठी पाकिस्तानची गुप्‍तचर संघटना (ISI) कडून आर्थिक मदत मिळत असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे

कोण होता जर्नेलसिंग भिंद्रनवाले ?

जर्नेलसिंग भिंद्रनवाले हा खलिस्तानच्या स्‍वतंत्र शीख राष्ट्राचा समर्थक होते. १९८४ मध्‍ये ऑपरेशन ब्लूस्टार मोहिमेत लष्‍कराने त्‍याला ठार मारले होते. अमृतपाल हाही खलिस्‍तानच्‍या मागणीसाठी सोशल मीडियावर आपली प्रतिमा जर्नेलसिंग भिंद्रनवाले अशी करत आहे.

अजनाला येथे लवप्रीत सिंग तुफान याच्या अटकेवरून अमृतपाल सिंग याचे समर्थक आणि पोलिसांमध्‍ये संघर्ष झाला होता. तलवारी आणि बंदुकीसह अमृतपालच्‍या समर्थकांनी सशस्त्र समर्थकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून अजनाळा पोलिस ठाण्यावर हल्‍लाबोल केला. निदर्शकांनी गुरु ग्रंथ साहिबचाही ढाल म्हणून वापर केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अमृतपाल सिंग आणि त्यांच्या समर्थकांशी चर्चा केल्यानंतर पंजाब पोलिसांनी लवप्रीत सिंग तुफानला सोडण्याचा निर्णय घेतला. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) अजनाळा घटनेची चौकशी करण्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे ज्यात गुरु ग्रंथ साहिब अजनाळा पोलीस ठाण्यात नेण्यात आला होता.

पंजाबमध्ये पुन्‍हा दहशतवादाला पसरविण्‍याचा ISI चा प्रयत्न

पंजाबमध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्‍याचा हा प्रयत्‍न केला जात आहे. सांप्रदायिक असंतोष पसरवण्याचा प्रयत्न करणार्‍या ISI-समर्थित खलिस्तानी दहशतवादी गटांबद्दल अलीकडच्या काळात गुप्तचर विभागाने आर्थिक मदत सुरु केली आहे. तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

धार्मिक नेते आणि गर्दीची ठिकाणे आयएसआय आणि खलिस्तानी दहशतवादी गटांच्या क्रॉसहेअरवर असल्याचा इशारा केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी पंधरवड्यापूर्वी जारी केला होता. पंजाब पोलिसांना पंजाब-जम्मू सीमेवर सतर्कता वाढवण्यास सांगितले होते, ज्याचा वापर आयएसआयकडून पंजाबमध्ये शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांची खेप पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो, असेही संशय सुरक्षा संस्‍थानी व्‍यक्‍त केला आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button