

अकोला: पु़ढारी वृत्तसेवा : हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Mahamarg) अकोलेकारांनाही उपयोग होऊ शकतो. परंतु, त्यासाठी त्यांना मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार नजीक अॅप्रोच रोड गाठावा लागेल. तेथून मुंबई, तसेच नागपूरला जाता येईल. अकोला ते शेलूबाजार अंतर 47 किमी. आहे. त्यामुळे अकोला नागपूर अंतर समृद्धी मार्गामुळे 279 किमी. च्या जवळपास होईल.
या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) 120 किमी प्रति तास वेगाने वाहने धावतील. त्यामुळे अंतर कमी होणार आहे. 1 तास अकोला ते शेलूबाजार आणि तेथून सव्वा दोन तास म्हणजे सव्वा तीन तासात नागपूरला पोहचता येईल. अकोला ते शेलूबाजार समृद्धी महामार्गापर्यंत चांगला रस्ता आहे. परंतु, दरम्यान 3 किमीचा रस्त्यावर खडीकरण केले आहे. अकोला ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.6 द्वारा अंतर 250 किमी. आहे. सध्या अकोला अमरावती महामार्गाचे नुतनीकरण सुरू आहे. त्यामुळे सध्या अकोला दर्यापूर, अमरावती मार्गे नागपूरला जावे लागत आहे. शासनाच्या म्हणण्यानुसार समृद्धी महामार्गाने नागपूर ते मुंबई हा प्रवास सात तासात होईल.
अभियंता मनीष मिश्रा म्हणाले की, जलदगतीने येण्या-जाण्यासाठी समृद्धी महामार्ग उपयोगी राहील. अकोल्याचे लोक शेलूबाजार जवळच्या अॅप्रोच पॉइंटने नागपूर, मुंबई जाण्यासाठी समृद्धी महामार्गाने जोडता येईल. अकोला ते कान्हेरी सरप, बार्शीटाकळी, महान, वाघागढहून शेलूबाजारच्या आधी समृद्धी महामार्गापर्यंत पोहचू शकतो.
हेही वाचलंत का ?