‘मेरी माटी मेरा देश’ अभियान नव्या उपक्रमासाठी प्रशासन सज्ज

‘मेरी माटी मेरा देश’ अभियान नव्या उपक्रमासाठी प्रशासन सज्ज
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गेल्यावर्षी 'हर घर तिरंगा', उपक्रमानंतर यावर्षी ऑगस्टमध्ये 'मेरी माटी मेरा देश' हे अभियान केंद्र व राज्य शासन राबवत आहे. या अभियानासाठी गाव पातळीपासून नगरपालिका ते महानगरपालिका असे प्रत्येकाने आपले 100 टक्के योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

शासनाकडून 9 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत मेरी माटी मेरा देश हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. मातृभूमीचे वंदन आणि वीरांना नमन ही मध्यवर्ती कल्पना असणाऱ्या या अभियानात गावागावांमध्ये मातृभूमीसाठी लढणाऱ्या विराप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. या संदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद व या संदर्भातील समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

शीलाफलकमचे समर्पण, पंचप्राण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरांना नमन, ध्वजारोहण व राष्ट्रगान अशा पंचसूत्रीत हा कार्यक्रम केला जाणार आहे. शीलाफलकांचे समर्पणाच्या अंतर्गत गावातील स्मरणीय ठिकाणी अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करण्यात येईल. यावर मातृभूमीसाठी बलिदान करणाऱ्या वीरांना नमन असे नमूद असेल. देशासाठी बलिदान करणाऱ्या गावातील वीरांचे नाव या शीलाफलकावर असेल. यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश व स्थानिक शहीद वीरांची नावे समाविष्ट असतील.

वसुधा वंदन या कार्यक्रमांमध्ये गावात 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात येईल व यातून अमृतवनाचे निर्माण करण्यात येईल. गावामध्ये किंवा गावाच्या कार्यक्षेत्रात ज्यांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी सुरक्षेसाठी बलिदान केले. त्या निवृत्त वीरांचा बलिदान करणाऱ्या वीरांचा व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान करण्यात येईल. पंचप्राण शपथ घेण्याच्या उपक्रमामांमध्ये हातात दिवे घेऊन शपथ घेण्याच्या कार्यक्रमाचा सहभाग आहे. प्रत्येक ठिकाणी ध्वजारोहण व तालुकास्तरावर माती कलशांमध्ये गोळा करण्याचा उपक्रम  राबवण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांना यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

.हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news