नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघीण आढळली मृतावस्थेत - पुढारी

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघीण आढळली मृतावस्थेत

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील सालेघाट परिक्षेत्रातील कक्ष क्र. ६२५ मध्ये एक वाघीण मृतावस्थेत आढळली. वन विभागाचे अधिकारी उपसंचालक व पशुवैद्यकीय आधिकारी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्‍यासाठी गेेल्‍या पर्यटकांनी वाघीणीचे  व्हिडिओ काढून ती जखमी असल्याची माहिती वनविभागाला दिली होती. व्हिडिओनुसार सदर वाघीणीच्या चालण्यात अनैसर्गिकता आढळली. त्यामुळे वनकर्मचारी या वाघीणीचे संनियत्रण करत होते. याच दरम्यान वाघीण मृतावस्थेत आढळली. यानंतर वन विभाग या वाघीणीचा मृत्यू कशामुळे झाला?, ती जखमी कशाने झाली याची चौकशी करत आहेत.

पेंचच्या सालेघाट वनपरिक्षेत्रात टी ३५ वाघीणींचे वास्तव्य होते. मृत झालेली वाघीण ही सात-आठ वर्षांची होती. २७ डिसेंबरला या वाघिणीचा व्हिडिओ व्हायरल झाला. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यातही ती व्यवस्थित चालत नसल्याचे आणि ओरडत असल्याचे दिसून आले. यानंतर वनअधिकारी आणि डॉक्टरांच्या टीमने पाहणी केली. त्यात तिच्या चेहऱ्यावर कुठल्याही जखमा दिसून आल्या नाहीत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल असे पेंचचे उपसंचालक प्रभूनाथ शुक्ला यांनी सांगितलं. दरम्यान, पाऊस सुरू असल्याने वाघिणीला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. या वाघीणीच्या मृत्यूचे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button