वाशिम : सराफ कामगाराची हत्या करून सोने चोरणाऱ्याला अटक

वाशिम : सराफ कामगाराची हत्या करून सोने चोरणाऱ्याला अटक

वाशिम, पुढारी वृत्तसेवा

वाशिम येथील मालेगाव शहरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास अंजनकर ज्वेलर्सचे मालक योगेश अंजनकर आणि कामगार रवी वाळेकर दुकान बंद करून घरी जात होते. त्यावेळी चोरट्याने हवेत गोळीबार करून धारदार शस्त्राने वार करत, त्यांच्याकडील 9 लाख रुपये किमतीचे सोने आणि 9 हजार रोकडची बॅग पळविली होती. यामध्ये कामगार रवी वाळेकर यांचा मृत्यू झाला तर योगेश अंजनकर गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी  मुख्य संशयित आरोपी अजाबराव घुगे (रा. सुकांडा, ता. मालेगाव) याला अटक करण्‍यात आली आहे.  पोलीसांनी त्याच्याकडून 53 ग्रॅम सोने आणि दोन गावठी पिस्तूल जप्त केले आहे.

वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. मालेगाव येथे घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली होती.  हा प्रश्‍न आमदार अमित झनक यांनी विधानसभेत मांडला हाेता.

वाशिम पोलिसांनी घुगे याला अटक केली आहे. उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोपी घुगे याने पोल्ट्री फार्मसाठी 12 लाखांचे कर्ज घेतले होते.  कर्ज फेडण्यासाठी त्याने हा कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news