चंद्रपूर : दुचाकी-बोलेरोमध्ये भीषण अपघात; दोघां मित्रांचा मृत्यू

चंद्रपूर : दुचाकी-बोलेरोमध्ये भीषण अपघात; दोघां मित्रांचा मृत्यू
Published on
Updated on

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा

भाचीच्या लग्न कार्यानिमित्त आयोजीत केलेला धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर परत येत असताना, चंद्रपूर एमआयडीसी परिसरात दुचाकी आणि बोलेरोमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला. ही घटना चंद्रपूर एमआयडीसी परिसरात काल बुधवारी ( ता.22) सायंकाळी 6 वाजताच्या.सुमारास घडली. सुधाकर लक्ष्मण धोटे (वय 43) व मनोज गणपती जुनघरे ( वय 47) रा. विसापूर ता. बल्लारपूर असे मृतांची नावे आहेत.

अपघातात मृत्यूमुखी पडलेले दोघेही जीवलग मित्र होते. दोघेही एकाच ठिकाणी नोकरीला होते. विसापूर येथील मनोज जुनघरे यांच्या भाचीचे 26 डिसेंबर रोजी लग्न ठरले होते. त्यानिमित्त मनोज मित्र सुधाकर धोटे याच्यासोबत एम. एच. 34 बी. क्यू. 0413 या दुचाकीने वणी जि. यवतमाळ येथे भाचीच्या लग्न कार्यानिमित्त देव पोहचविण्यासाठी गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते घुग्घुस मार्गाने विसापूरकडे येत होते.

दरम्यान एमआयडीसी परिसरात मल्टी ऑर्गॅनिक कपंनी जवळील वळणावर बोलेरो वाहन क्रमांक एम. एच.34-एम. 2544 ने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार सुधाकर धोटे जागीच ठार झाले. तर मनोज जुनघरे यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात दोघां मित्रांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने विसापूर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news