नागपूर : रिलायन्स रिटेलच्या गोदामाला भीषण आग | पुढारी

नागपूर : रिलायन्स रिटेलच्या गोदामाला भीषण आग

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा

नागपूरच्या निमची गावातील रिलायन्स रिटेलच्या गोदामाला भीषण आग लागली. आज (गुरूवार) पहाटे लागलेल्या आगीमुळे स्थानिकांना मदत मिळवण्यात अडचण आली. नागपूरच्या निमची गावात रिलायन्स रिटेलच्या गोदामाला आग लागली आहे.

आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहेत. भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रिलायन्स रिटेलच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. रिलायन्सच्या या गोदामात स्टोअरमधून विकले जाणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे. या दुर्घटनेत मोठ नुकसान झाल्याची शक्यता आहे.

यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आगीत मोठी वित्तहानी झाली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Back to top button