विधानपरिषद : कॉंग्रेसमधील हुकूमशाहीला मतदार कंटाळले, नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा : चंद्रशेखर बावनकुळे

विधानपरिषद : कॉंग्रेसमधील हुकूमशाहीला मतदार कंटाळले, नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

विधानपरिषद निवडणुकीत नागपुरात झालेल्या काँग्रेसच्या पराभवाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारणीभूत असून ,पटोलेंनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नागपूर विधानपरिषदेच्या निवडणूकीतील विजयी उमेदवार भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

बावनकुळे यांनी ३६२ मते घेत नाना पटोले यांनी काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा १७६ मतांनी पराभव केला. मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली. तर बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली. भारतीय जनता पक्षाकडे ५६० पैकी ३१८ मते होती मात्र मला तब्ब्ल ४४ मते अधिक मिळाली.

काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या हुकूमशाहीला काँग्रेसचे मतदार कंटाळले आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी मतदान केल्यामुळेच काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली. काँग्रेसची मते कुठे गेली? हे सांगण्याची गरज नाही असेही बावनकुळे म्हणाले.

ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या म्हणण्यानुसार उमेदवार बदलला. काँग्रेसचा अधिकृत उमेदवार बदलण्याची नामुष्की नाना पटोलेंमुळे काँग्रेसवर ओढवली. आणि मंगेश देशमुख या अपक्ष असलेल्या काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराला पराभप पत्करावा लागला त्यामुळे नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजिनामा द्यावा अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news