चंद्रपूर : मुलांनी वडिलांच्या प्रेयसीची धारधार शस्‍त्राने केली हत्‍या | पुढारी

चंद्रपूर : मुलांनी वडिलांच्या प्रेयसीची धारधार शस्‍त्राने केली हत्‍या

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा

आई आणि वडिलांमध्ये ‘ती’ आल्याने घरातील वातावरण बिघडले. ही बाब असह्य झाल्याने दोन मुलांनी वडिलांची प्रेयसी असलेल्या ‘ती’चा धारदार शस्त्राने हत्या करून काटा काढला. ही थरारक घटना काल (बुधवार) सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास रमाबाई नगर परिसरात झरपट नदीच्या काठावर घडली. मना मनोज कोठार (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेनंतर दोघेही भावंडे फरार झाली. मात्र अवघ्या पाच तासांतच रामनगर पोलिसांनी या घटनेचा छडा लावत दोघांनाही अटक केली. यात एक अल्पवयीन असून दुसऱ्याचे नाव अमरजित शशीकपूर चव्हाण (२०) असे आहे.

गेल्या वर्षभरापासून ती पती व मुलांपासून विभक्त राहते

मना कोठार हिला तीन मुले आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून ती पती व मुलांपासून विभक्त राहते. तिचा पती बाहेर राज्यात आपल्या मुलांसोबत राहतो. अशातच तिची ओळख शशीकपूर चव्हाण यांच्याशी झाली. दोघांत प्रेम जुळले. यातून त्यांच्यात जवळीक वाढली.

आपल्या आई-वडिलांच्या मध्ये परस्त्री आल्याची बाब चव्हाण यांच्या मुलांना खटकली. यावरून घरातील घरातील वातावरण बिघडले. तेव्हापासूनच या महिलेचा काटा काढण्याचा कट शशीकपूर चव्हाण यांचा मुलगा अमरजित व त्याचा अल्पवयीन चुलत भाऊ यांनी रचला. हे दोघेही मनावर पाळत ठेवत होते.

बुधवारी सकाळी मना ही झरपट नदीच्या काठावर प्रात:विधीसाठी गेली होती. अशातच मागावर असलेल्या चव्हाण बंधूंनी तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ती जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. यानंतर हे दोघे भाऊ घटनास्थळावरून पसार झाले.

काही वेळाने परिसरातील नागरिकांना मनाचा मृतदेह दिसताच याची माहिती रामनगर पोलिसांना दिली. दरम्यान, नव्यानेच नियुक्त झालेले रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपानी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

तपासात चव्हाण नावाच्या व्यक्तीसोबत महिलेचे प्रेमसंबंध असल्याची बाब पुढे

पोलीस तपासात चव्हाण नावाच्या व्यक्तीसोबत या महिलेचे प्रेमसंबंध असल्याची बाब पुढे येताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. चव्हाण यांची मुले घरातून बेपत्ता असल्याचे लक्षात येताच संशय बळावला. अखेर गतीने शोध घेऊन अमरजित चव्हाण व त्याच्या अल्पवयीन चुलत भावाला ताब्यात घेतले. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपानी करीत आहेत.

Back to top button