नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील कामठी-कन्हान महामार्गावरील साई मंदिर जवळील कन्हान नदीच्या पुलावर रविवारी (दि.१६) सायंकाळी ऑटो रिक्षा आणि ट्रॅव्हल्स बसमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात गार्डस रेंजिमेंटल सेंटरच्या (जीआरसी) दोन लष्करी जवानाचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. जखमीमध्ये ऑटोचालकासह इतर लष्करी जवानांचा समावेश आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपुरातील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कन्हानकडून कामठीच्या दिशेने येत असलेल्या ऑटों (क्रं. एमएच ४९ – एआर – ७४३३ ) ला नागपूरवरून जबलपुरकडे भरधाव जात असलेल्या पवन ट्रॅव्हल्स (क्रं. एमएच 31 4158) ने जोरदार घडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, डाव्या बाजूने जात असलेला ऑटो जागीच फिरून उजव्या बाजुला पुलाच्या काठाला धडकून पूर्णपणे चकनाचूर झाला. ट्रॅव्हल्सचा समोरच्या भागचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी ऑटोच्या काचा पसरलेल्या तसेच रक्ताचा सडा पडलेला असल्याने या अपघाताची भीषणता मन हेलावणारी होती. घटनास्थळी लोकांनी गर्दी करत ऑटोमधील जखमींना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी सहकार्य केले. या ऑटोमध्ये ऑटो चालकासहित एकूण आठ जण होते. यापैकी पाच जण अत्यंत गभीर असल्याने त्यांना नागपूर येथील मेयो रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले तर तीन जखमींना कामठी येथील आशा हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. नागपूर येथील मेयो हॉस्पिटलला उपचार सुरू असतांना जवान विघ्नेश कुमार आणि धीरज रॉय या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एकूण सहा जखमी पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर काही काळ कन्हान नदीच्या पुलावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करत वाहनांना मोकळी वाट करून दिली.
हेही वाचा :