नागपूर : ऑटो-ट्रॅव्हल्‍स बस भीषण अपघातातील मृतांची संख्या ३ वर पोहोचली

file photo
file photo

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा नागपूर जिल्ह्यातील कामठी-कन्हान महामार्गावर काल (रविवार) सायंकाळी ऑटो आणि ट्रॅव्हल्स बसमध्ये झालेल्या भीषण अपघातातील मृतकांची संख्या तीनवर पोहोचली आहे. यापूर्वी विघ्नेश आणि धीरज रॉय या दोन लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता. आता ऑटोचालक शंकर विठ्ठलराव खरगवान (वय,45) रा.कामठी यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या शिवाय 6 जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. गार्डस रेंजिमेंटल सेंटरचे (जीआरसी) 8 जवान कन्हानला गेले होते. येथून कामठीत परतताना हा भीषण अपघात झाला. एका लष्करी जवानाचा घटनास्थळी तर दुसऱ्याचा नागपुरात मृत्यू झाला. तर 7 जण जखमी झाले. जखमींमध्ये ऑटोचालकासह इतर लष्करी जवानांचाही समावेश आहे. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपुरातील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कन्हानकडून कामठीच्या दिशेने येत असलेल्या ऑटो क्रं. एमएच 49 – एआर -7433 ला नागपुरवरून जबलपुरकडे भरधाव जात असलेल्या पवन ट्रॅव्हल्स क्रं. एमएच 31 4158 ने जोरदार घडक दिली. ही घडक इतकी जोरदार होती की डाव्या बाजुने जात असलेला ऑटो जागीच फिरून उजव्या बाजुला पुलाच्या काठाला धडकून पूर्णपणे चकनाचूर झाली. ट्रॅव्हल्सचा समोरच्या भागही क्षतिग्रस्त झाला.
घटनास्थळी ऑटोच्या काचा पसरलेल्या तसेच रक्ताचा सडा पडलेला असल्याने या अपघाताची भीषणता मन हेलावणारी होती.

घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. अनेकांनी ऑटोमधील जखमींना बाहेर काढून त्यांना हॉस्पिटलला नेण्यासाठी सहकार्य केले. या ऑटोमध्ये ऑटो चालकासहित एकूण आठजण होते. यापैकी पाचजण अत्यंत गभीर असल्याने त्यांना नागपूर येथील मेयो रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, तर ३ जखमींना कामठी येथील आशा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news