Lok sabha Election 2024 Results : चंद्रपूर: प्रतिभा धानोरकर २४ हजार मतांनी आघाडीवर, मुनगंटीवार पिछाडीवर

Lok sabha Election 2024 Results : चंद्रपूर: प्रतिभा धानोरकर २४ हजार मतांनी आघाडीवर, मुनगंटीवार पिछाडीवर

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा :  चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची दुसरी फेरी पूर्ण झाली असून यामध्ये प्रतिभा धानोरकर ह्या 24 हजार 63 मताने आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे पाहिल्या आणि दुसऱ्या फेरीत पिछाडीवर आहेत. विशेष म्हणजे धानोरकर यांनी दोन्ही  फेरीत आघाडी घेतली आहे.

13 चंद्रपुर लोकसभा मतदार संघाच्या दूसऱ्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार प्रतीभा धानोकर यांनी भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना 24063 मतांनी मागे टाकीत आघाडी घेतली आहे. प्रतिभा धानोरकर यांना 61320 तर सुधीर मुनगंटीवार यांना 37257 मते मिळाली आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची अत्यंत चुरशीची लढत होईल अशी आशा असताना पाहिल्या आणि दुसऱ्या फेरीत धानोरकर यांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीची पोस्टल मतमोजणी आठ वाजता पासून सुरू झाली त्यांनंतर मशीन व्दारे मतमोजणीला सुरूवात झाली. काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना हिल्याच फेरीत 30 हजार मते मिळाली तर दुसऱ्या फेरीत 31320 मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीत धानोरकर यांना 10 हजार 803 मताने आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत ही आकडेवारी वाढून 24 हजार 63 झाली आहे.

विधानसभा क्षेत्र निहाय प्रतिभा धानोरकर यांना दुसऱ्या फेरीत 70 राजूरा विधानसभा क्षेत्रात 6532, चंद्रपूर 5403, बल्लारपूर 5035, वरोरा 4485, वणी 5075, आर्णी 4790 मते मिळाली आहेत.
सद्या तिसरी फेरी सुरू असून धानोरकर यांची आघाडी वाढत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news