JEE Main Result : जेईई मेन सेशन २ मध्ये शेतकऱ्याच्या मुलाचा डंका; वाशिममधील निलकृष्ण गजरे देशात पहिला | पुढारी

JEE Main Result : जेईई मेन सेशन २ मध्ये शेतकऱ्याच्या मुलाचा डंका; वाशिममधील निलकृष्ण गजरे देशात पहिला

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जेईई मुख्य परीक्षेचा दुसर्‍या सत्राचा निकाल एनटीएने जाहीर केला असून यात दोन मुलींसह ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले. यात महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांचा समावेश असून वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीरचा शेतकरी कुटुंबातील मुलाने  देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. वाशिममधील निलकृष्ण निर्मलकुमार गजरे याने १०० टक्के गुणांसह देशात पहिला आला आहे. याशिवाय विदर्भातील मोहम्मद सुफियान आणि देवांश गट्टानी यांनीही यश मिळविले आहे. (JEE Main Result)

जेईई मुख्य निकालात नागपूरच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. शहरातील १२ विद्यार्थ्यांनी पहिल्या १०० विद्यार्थ्यांमध्ये स्थान प्राप्त केले. यात मूळचा दर्यापूर येथील रहिवासी व नागपुरात शिक्षण घेत असलेला मोहम्मद सुफियानने १६ वी रँक प्राप्त केली. यासह देवांश गट्टानी याने ९९.९९ टक्के गुण प्राप्त करीत ऑल इंडिया ८२ वी रँक तर अक्षत खंडेलवालने ९० वी रँक प्राप्त केली. (JEE Main Result)

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी

निलकृष्ण हा बेलखेड (ता. मंगरूळपीर) या छोट्याशा खेड्यातील शेतकरी निर्मलकुमार गजरे यांचा मुलगा आहे. दहावीपर्यंत कारंजा येथे शिक्षण झालेल्या निलकृष्णाने त्यानंतर शेगावच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. आयआयटी मुंबईचे ध्येय ठरविलेल्या निलकृष्णने पुढच्या तयारीसाठी नागपूर गाठले व खाजगी शिकवणी वर्गातून अभ्यास केला. निलने जेईईच्या पहिल्या परीक्षेतही गुणवत्तापूर्ण यश प्राप्त केले. त्याचे यश नागपूरसाठीच नव्हे तर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. (JEE Main Result)

महाराष्ट्रातील 7 टॉपर विद्यार्थी

  • निलकृष्ण निर्मलकुमार गजरे (१रँक)
  • दक्षेस संजय मिश्रा (२ रँक)
  • आर्यन प्रकाश (१० रँक)
  • मोहम्मद सुफियान (१६ रँक)
  • विशारद श्रीवास्तव (४० रँक)
  • प्रणव प्रमोद पाटील (५१ रँक)
  • अर्चित राहुल पाटील (५३ रँक)

हेही वाचा :

Back to top button