चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात पहिल्या दोन तासात 7.44 टक्के मतदान

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात पहिल्या दोन तासात 7.44 टक्के मतदान
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात पहिल्या दोन तासात 7.44 टक्के मतदान

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला आज (शुक्रवार) सकाळी सात वाजल्‍यापासून सुरूवात झाली. यामध्ये पहिलया 7 ते 9 या दोन तासात 7.44 टक्के मतदान झाले.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहेत. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत. आज शुक्रवारी सकाळी सात वाजल्‍यापासून मतदानाला सुरूवात झाली. सकाळी सात ते 9 या पहिल्या दोन तासात 7.44 टकके मतदान पार पडले.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामध्ये 70-राजुरा 6.30 टक्के, 71-चंद्रपूर 7 टक्के, 72-बल्लारपूर 7.80 टक्के, 75-वरोरा 7.01 टक्के, 76-वणी 7.41 टक्के, 80-आर्णी 9.12 टक्के मतदान झाले आहे.

राजूरा मतदारसंघात 330 मतदान केंद्र, चंद्रपूर मतदारसंघात 383 मतदान केंद्र, बल्लारपूर मतदारसंघात 361 मतदान केंद्र, वरोरा मतदारसंघात 340 मतदान केंद्र, वणी मतदारसंघात 338 मतदान केंद्र तर आर्णि मतदारसंघात 366 मतदान केंद्र असे एकूण 2118 मतदान केंद्रावर सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळात 18 लाख 37 हजार 906 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news