चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात अकरा वाजेपर्यंत १८.९४ टक्के मतदान | पुढारी

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात अकरा वाजेपर्यंत १८.९४ टक्के मतदान

चंद्रपूर -पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली. यामध्ये पहिल्या दोन तासांत ९ वाजेपर्यंत ७.४४ टक्के मतदान झाले. त्यानंतर अकरा वाजेपर्यंत १८.९४ टक्के मतदान झाले आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत काँग्रसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर, वंचितचे राजेश बेले यांच्यासह आमदार किशोर जोरगेवर, आमदार सुधाकर अडबाले यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लक्ष ३७ हजार ९०६ मतदार आहेत. यात ९ लक्ष ४५ हजार ७३६ पुरुष मतदार, ८ लक्ष ९२ हजार १२२ स्त्री मतदार तर ४८ इतर मतदार आहेत. आज शुक्रवारी सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरूवात झाली. सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४४ टक्के मतदान पार पडले. त्यानंतर अकरा वाजेपर्यंत १८.९४ टक्के मतदान पार पडले.

अकरा वाजेपर्यंत काँग्रसेचे उमेदवार प्रतिभा धानोरकर, वंचितचे राजेश बेले यांचेसह आमदार किशोर जोरगेवर आणि शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. धानोरकर यांनी वरोरा येथे, जोरगेवार यांनी चंद्रपुरातील सरदार पटेल महाविद्यालयातील केंद्रावर सहकुटुंब मतदान केले. सुधीर मुनगंटीवार यांनी मतदानापूर्वी माता महाकालीचे दर्शन घेतले आहे.

सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील ७०-राजुरा २१.४० टक्के, ७१-चंद्रपूर १९.०३ टक्के, ७२-बल्लारपूर २०.१० टक्के, ७५-वरोरा १७.६५ टक्के, ७६-वणी १९.०६ टक्के, ८०-आर्णी १५.५० टक्के अकरा वाजेपर्यंत मतदान झाले आहे.

काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर, वंचितचे राजेश बेले यांच्यासह आमदार जोरगेवार, सुधाकर अडबाले यांनी मतदान केले. खा. प्रफुल्ल पटेलांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रांवरील अव्यवस्थेची जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकाऱ्यांना तक्रार केली.

Back to top button