Jayant Patil |…त्यामुळेच ते शरद पवारांना भाजपमध्ये जाण्यास आग्रह करत होते: जयंत पाटील

Jayant Patil |…त्यामुळेच ते शरद पवारांना भाजपमध्ये जाण्यास आग्रह करत होते: जयंत पाटील

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कधीही भाजप सोबत जाणार नव्हते, जाणार होते तर मग ते का गेले नाहीत? उलट जे आज दावा करताहेत त्यांनाच तिकडे जाण्याची इच्छा होती, त्यामुळेच ते आग्रह करत होते, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (दि.१२) केला. Jayant Patil

वर्धा मतदार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ आले असता ते विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
शरद पवार यांना कधीही भाजपची विचारसरणी पटली नाही, त्यामुळे ते या विचारसरणीच्या विरोधात होते. जायचे असते तर ते तेव्हाच गेले असते, असा प्रति प्रश्नही त्यांनी कुणाचे नाव न घेता अजित पवार गटाला केला. माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद शरद पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजितदादांनी घेतल्यानंतर भाजप सोबत येण्यास ५० % तयार होते. या संदर्भात एका उद्योगपतीकडे बैठकही झाली होती, असा दावा माध्यमांशी बोलताना केला होता. Jayant Patil

स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पाटील यांच्या बोलण्यात तथ्य असल्याचे म्हटले होते. या संदर्भात आज विदर्भ दौऱ्यावर आलेले जयंत पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला. दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे या शंभर टक्के विजयी होतील, असा दावा त्यांनी केला. शरदचंद्र पवार यांनी ओरिजनल पवार मीच असल्याचे म्हटले आहे, याबाबत छेडले असता ते योग्य तेच बोलले.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नकली राष्ट्रवादी काँग्रेस नकली शिवसेना असे टीकास्त्र सोडले. या संदर्भात बोलताना जयंत पाटील यांनी आपणच पक्ष फोडायचा आणि आपणच नकली असली ठरवायचे, याचे उत्तर आता राज्यातील जनता मतपेटीतूनच देणार आहे. सांगली, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील राजी नाराजीवरून आता बोलण्यात अर्थ नाही. महाविकास आघाडीचे जागावाटप झालेले आहे. महाविकास आघाडीला कुठेही धक्का पोहोचेल, असे विधान कोणी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ बोलून उपयोग नाही.

शरद पवारांनी काय विकास केला, असा सवाल अमित शहा यांनी केला. या संदर्भात बोलताना योग्यवेळी योग्य उत्तर देऊ आणि त्यांच्या बोलण्याला लगेच उत्तर द्यायचे नसते, असेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले हे कर्मचारी, शेतकरी, महिला, युवक सर्वांनाच माहिती आहे. जनता योग्य उत्तर देईल, असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावरील सहभाग ही चांगली गोष्ट आहे. राज ठाकरे मोदींच्या बरोबरचे नेते झाल्याचे भाजपने मान्य केल्याचे दिसते, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news