पटत नसेल तर गोळी तयार ; सत्ताधारी शिवसेना, भाजपला जयंत पाटील यांचा टोला | पुढारी

पटत नसेल तर गोळी तयार ; सत्ताधारी शिवसेना, भाजपला जयंत पाटील यांचा टोला

राजगुरुनगर : पटत नसेल तर गोळी तयार आहे, अशी सत्तेतील पक्षांची एकमेकांबद्दलची भूमिका बनली आहे. तेच एकमेकांच्या विरोधात आहेत. अधिकारी सत्तेत बसलेल्या नेत्यांचे ऐकुन काम करीत आहेत. महाराष्ट्रात अशी स्थिती कधीच नव्हती, अशी सणसणीत चपराक शिंदे शिवसेना आणि भाजपला खासदार शरद पवार गटाचे प्रमुख नेते जयंत पाटील यांनी लगावली. राष्ट्रवादीत फूट व त्यानंतर निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पारड्यात टाकल्यानंतर राजगुरुनगर येथे गुरूवारी (दि. 8) खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. कल्याण येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे सेनेच्या शहर अध्यक्षावर पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी सत्ताधार्‍यांना वरील टोला लगावला. जगन्नाथ शेवाळे, अ‍ॅड. राजमाला बुट्टे पाटील, देवदत्त निकम, हिरामण सातकर, सुधिर मुंगसे, अ’ड. देविदास शिंदे, अ’ड. दिलीप करंडे आदी यावेळी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणूक, आमदार रोहित पवार यांच्या वरील ईडी कारवाई, कांदा निर्यात बंदी, मराठा आरक्षण आदी प्रश्नांवर बोलताना जयंत पाटील यांनी सत्ताधार्‍यांवर टीका केली.

Back to top button