वाशिम: ग्राम शेलूबाजार येथून छापा टाकून ३ लाखांचा गुटखा जप्त

वाशिम: ग्राम शेलूबाजार येथून छापा टाकून ३ लाखांचा गुटखा जप्त

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : मंगरूळपीर हद्दीतील ग्राम शेलूबाजार, ग्रामलाठी येथे धाड टाकून ३ लाख ५१ हजार ६४४ रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला. या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. ही कारवाई वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने रविवारी (दि.७) रात्री करण्यात आली.

ग्रामलाठी येथे शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा व पान मसाला अवैधपणे साठवल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ३ लाख ५१ हजार ६४४ रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे, दीपक सोनवणे, अमोल इंगोले, प्रविण राऊत, विठ्ठल सुर्वे, तेजस्विनी खोडके, संदिप डाखोरे यांनी केली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news