वाशिम: पन्हाळा खू. येथे स्थिर सर्वक्षण पथकाकडून ३ लाख जप्त | पुढारी

वाशिम: पन्हाळा खू. येथे स्थिर सर्वक्षण पथकाकडून ३ लाख जप्त

वाशिम: पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा खू. (ता.वाशिम) येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने आज (दि.5)  सकाळी   रोख 3 लाख 10 हजार रुपयांची रोकड जप्त केली. पन्हाळा चेक पोस्ट शेलु बु. येथे पथक प्रमुख शैलेश विनायक  यांनी ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की,  निलेश मारुती शिंदे (रा.बोरगाव ता. करमाळा, जि. सोलापूर) ऊस तोडणी कामगारांना मजुरीचे अॅडव्हान्स पेमेंट देण्यासाठी निघाले होते. परंतु, त्यांच्याकडे हे पैसे कुठून आले. या पैशांचा वापर कशासाठी करणार आहे. याचा ते  समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून  तीन लाख दहा हजार रुपयांची रोकड जप्त केली. या रक्कमेबाबत  संबधित लोकांनी योग्य पुरावा सादर केल्यानंतर त्यांना ती रक्कम परत करण्यात येते, अशी माहिती पथक प्रमुख शैलेश डोळस यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button