Chitra Wagh on Nana Patole:  चित्रा वाघ यांची नाना पटोले यांच्यावर बोचरी टीका, म्हणाल्या…    | पुढारी

Chitra Wagh on Nana Patole:  चित्रा वाघ यांची नाना पटोले यांच्यावर बोचरी टीका, म्हणाल्या...   

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : नाना पटोले हा लफडेबाज माणूस असून त्यांना लाज वाटली पाहिजे, ते अकोला येथे जाऊन आमचे खासदार संजय धोत्रे यांचा मृत्यू झाला, पाहिजे असे म्हणतात. इतक्या खालच्या पातळीची वाईट मानसिकता या लफडेबाज नानाची आहे. या खालच्या पातळीच्या कृतीबद्दल त्यांनी खासदार संजय धोत्रे आणि अकोलेकर जनतेची माफी मागितली पाहिजे, असा घणाघात गोंदिया-भंडारा लोकसभाच्या भाजप निरीक्षक चित्रा वाघ यांनी गोंदियात माध्यमांशी संवाद साधताना केला.  Chitra Wagh on Nana Patole
पुढे एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या, संजय राऊत हा आर्थिक लुबाडणुकीच्या गुन्ह्यात सध्या जामिनावर सुटलेला माणूस आहे. अशा १०३ दिवस कारागृहात असलेल्या माणसाला गांभिर्याने घेण्याची गरज मला तरी वाटत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर त्याची जागा परत कारागृहातच असणार आहे. अबकी बार ४०० पार झाले. तर भाजप संविधान बदलणार, असे आरोप विरोधक करतात. यावर बोलताना वाघ म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींनी यांनी सर्वांची खाऊ-खाऊ बंद केली आहे. विरोधकांना भ्रष्टाचाराची सवय झाली आहे. हे कितीतरी वेळा आत बाहेर झालेले आहेत. Chitra Wagh on Nana Patole
तो मद्य घोटाळ्यातील अरविंद केजरीवाल, तो चारा घोटाळ्यातील लालू यादव, तो जमीन घोटाळ्यातील हेमंत सोरेन, प. बंगाल संदेशखाली घटनेची संशयाची सुई असलेली ममता बॅनर्जी, हे सगळी घोटाळेबाज मंडळी मोदींच्या ‘ना खाऊंगा ना खाने दुंगाʼ या धोरणाने त्रस्त झालेले आहेत. म्हणून यांना पुन्हा मोदी नको आहेत. पण या देशातील बहुतांश जनता मोदींच्या पाठीशी आहे. येत्या ४ जूनला या सगळ्यांना चारही मुंड्या चीत केल्याशिवाय मोदी राहणार नाहीत. असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी त्यांच्या सोबत खासदार पत्नी शुभांगी मेंढे, माजी नगर सेविका मैथिली पुरोहित, निर्मला मिश्रा , मैथूला बिसेन उपस्थित होत्या.
हेही वाचा 

Back to top button