पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की , राज्यात काँग्रेसला ७ जागांवर पाठिंबा देण्याचं पत्र पाठवण्यात आलं होतं, मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याला केवळ दोन जांगावर पाठिंबा हवा आहे. यातून भाजपच्या काही नेत्यांसोबत त्यांचे संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेसने पटोलेंना भंडारा गोंदियातून उमेदवारी जाहीर केली, पण त्यांनी का माघार घेतली. हे आता समोर येत आहे. त्यांना भाजपसोबत लढायचे नव्हते . दुसरीकडे काँग्रेसचा उमेदवार जिंकणार यापेक्षा नितीन गडकरी हरतील याच दुःख त्यांना होतं आहे.