अभिनेता गोविंदा उमेदवार नव्हे, शिवसेनेचा स्टार प्रचारक, विदर्भातून प्रचाराला करणार सुरूवात          

अभिनेता गोविंदा उमेदवार नव्हे, शिवसेनेचा स्टार प्रचारक, विदर्भातून प्रचाराला करणार सुरूवात          

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेणारे अभिनेता गोविंदा निवडणूक लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ते पहिल्या टप्प्यातील विदर्भात होत असलेल्या निवडणुकीत शिवसेना उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी येणार आहेत, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.  Actor Govinda

अभिनेता गोविंदा शिवसेनेच्या तिकिटावर मुंबईतून निवडणूक लढणार, अशी चर्चा असतानाच आपण  निवडणूक लढणार नाही. तर शिवसेनेचा प्रचार करणार, अशी भूमिका गोविंदाने जाहीर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. Actor Govinda

पहिल्या टप्प्यात येत्या ४  ते ६ एप्रिल दरम्यान गोविंदा नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात शिवसेना व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे. यानंतर ११  व १२ एप्रिलरोजी यवतमाळ- वाशिम मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करतील.  १५ आणि १६ एप्रिलला हिंगोली मतदारसंघात ते  प्रचाराला जाणार आहेत.

दरम्यान, १७ आणि १८ एप्रिलरोजी  गोविंदा शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी बुलढाणा मतदारसंघात येणार आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news