नागपूर; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत लोककसभा निवडणुकीची घोषणा होत असताना काही भागात आज (दि.१६) दुपारी वादळी पाऊस, गारपीट नागपूरकरांना अनुभवास आली. मानकापूर, कोराडी, राजनगर, सिव्हील लाईन्स या परिसरात जोरदार गारांचा पाऊस झाला.
शहराच्या इतर भागात जोरदार वाऱ्यासह गेल्या दोन-तीन दिवसांत तापमान 37-38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे हवेत उष्मा वाढला होता. आज दुपारी अचानक ढगाळ वातावरणाने आर्द्रता वाढविली. काही काळ आलेल्या पावसाने गारवा वाढविला असला तरी नंतर पुन्हा एकदा उकड्यात भर पडली. कळमना परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली. तर काही ठिकाणी उंच सिमेंट रस्त्यांमुळे घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या.
हेही वाचा